Ad will apear here
Next
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन
खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन. या वेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार संजय राऊत, आनंदराव अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार संजय राऊत, आनंदराव अडसूळ, तेलंगणा राष्ट्रसमिती पक्षाचे नेते जितेंद्र रेड्डी, विविध राज्यातील पक्षाचे खासदार, तसेच महाराष्ट्रातील खासदार या वेळी उपस्थित होते. 

या वेळी महाजन म्हणाल्या, ‘बारणे यांचे लोकसभेतील कामकाज गौरवण्यासारखे आहे. त्यांनी सातत्याने विविध प्रश्नांद्वारे संसदीय कामकाजामध्ये भाग घेतला असून, कार्यकुशल खासदारामध्ये त्यांची गणना होते. मी या अगोदरही त्यांच्या मतदार संघामध्ये चिंचवड येथे क्रांतिवीर चाफेकरांच्या टपाल तिकिटाचे अनावरण प्रसंगी गेले असता त्यांच्या मतदार संघातील कामही जवळून पाहिले आहे. केंद्र सरकारच्या पासपोर्ट कार्यालय निर्मितीपासून दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात लाईट पोहोचविण्यापर्यंत त्यांनी केलेले काम, हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्स या ऐतिहासिक कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी केलेली धडपड जनतेसाठी झोकून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचे काम दर्शवितात.’

‘केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे एका खासदाराला करावी लागते याची मांडणी त्यांनी केली असून, सर्व सध्या लोकसभेच्या कामकाजात होत असलेला गदारोळ पाहता सामान्य जनतेमध्ये त्याविषयी नाराजी पसरते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतर सदस्यांनीही बारणे यांचा चांगल्या कामाचा दाखला घ्यावा’,असे महाजन यांनी सांगितले. 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते म्हणाले, ‘बारणे यांची काम करण्याची लोकसभेतील धडपड ही चळवळीतील तळमळीच्या कार्यकर्त्याची आहे. आज या कार्यक्रमाला असलेली लोकसभा सदस्यांची उपस्थिती हा त्यांनी संसदेत त्यांच्या स्वभावाने जमा केलेला ठेवा आहे. माझ्या एका सहकाऱ्याने संसदीय कामाकाजाच्या अनुभव असलेले पुस्तक लिहिले याचा मला सार्थ अभिमान आहे.’

खासदार संजय राऊत म्हणाले, ‘बारणे यांनी यापूर्वीही तीन पुस्तके लिहिली असून, महाराष्ट्रातील एक मराठी खासदार दिल्लीमधील कामकाजाविषयी त्याचे अनुभव पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करतो ही कदाचित पहिली घटना असावी. बारणे यांचा नम्र स्वभाव, प्रचंड लोकसंपर्क, थोड्या कालावधीत संसदेमध्ये मिळवलेला अनुभव या माध्यमातून दिल्ली येथे बारणे यांनी कार्यकुशल खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. बारणे यांच्या पुस्तकातून लोकसभेच्या कामकाजाचा उलगडा होत असून, त्यांचे पुस्तक इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे.’ 

केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनीही बारणे यांच्या या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.

गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाच्या पाठपुराव्याविषयी माहिती या पुस्तकात देण्यात आली असून, अनेक छायाचित्रांसहित दाखले दिले आहेत. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संदेश या पुस्तकात आहेत. याच बरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील १९ खासदारांनी बारणे यांच्या कार्याचा गौरव या पुस्तकात केला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZWVBW
Similar Posts
संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट पुणे : संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समितीमध्ये लोकसभेमधील ३० सदस्य आहेत.
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार’ पुणे : ‘मराठी भाषा ही जगातील १०व्या क्रमांकाची भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करेन,’ असे आश्वासन लोकसभेच्या सभापती खासदार सुमित्रा महाजन यांनी दिले. ९१ व्या बडोदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र गुर्जर आणि साहित्यसेतूचे प्रा. क्षितीज पाटुकले यांनी
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानावर पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दहावे स्थान मिळवले आहे. सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाने पहिल्या दहामध्ये स्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षी या यादीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर होते. सर्व संस्थांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १७वे स्थान मिळाले आहे
शेतकरी आत्मक्लेश यात्रेला पाठिंबा निगडी (पुणे) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी आत्मक्लेश यात्रेत अनेकांनी सहभाग नोंदवला होता. आकुर्डी-निगडी येथील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनीही यात्रेत सहभागी होऊन आपला पाठींबा दर्शविला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language